मनसे पक्ष प्रवेश आणि तिर्लोट येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न….

देवगड,दि.१६ जानेवारी
तालुक्यातील तिर्लोट गावातील ग्रामस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे सरचिटणीस आणि सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक संदिप दळवी यांच्या उपस्थितीत व तालुका अध्यक्ष संतोष मयेकर यांच्या नेतृत्वाखाली सौ स्वाती सावंत,सह ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश केला. यावेळी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संदिप दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रसंगी देवगड तालुका अध्यक्ष संतोष मयेकर , जिल्हा अध्यक्ष ऍड अनिल केसरकर ,उप जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, उप जिल्हा अध्यक्ष चंदन मेस्त्री ,तालुका सचिव जगदीश जाधव, महाराष्ट्र सैनिक बबलू परब, सिद्धार्थ जाधव ,रुपेश पांगम,मकरंद राऊत,प्रवीण मयेकर,शिवानी जाधव,शीतल जाधव,राजन पवार आणि देवगड मधील महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.