विजयदुर्ग घरीवाडी येथे छापा गोवा बनावटीची दारू केली जप्त

देवगड,दि. ३ एप्रिल

देवगड तालुक्यातील रामेश्वर घरीवाडी येथे विजयदुर्ग पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुमारे २६ हजार ५०० रुपयाची गोवा बनावटीची अवैध दारू जप्त केली आहे. याप्रकरणी येथील तेथील संशयित परशुराम शंकर पुरळकर वय ४९ यांच्या विरुद्ध विजयदुर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामेश्वर घरीवाडी येथील संशयित परशुराम पुरळकर हा विनापरवाना अवैध दारू विक्री करीत असल्याची माहिती विजयदुर्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवळकर, पोलीस हवालदार प्रशांत जाधव, गणेश भोवड, श्री कांडर यांच्या टीमने रामेश्वर घरीवाडी येथे छापा टाकून संशयितावर कारवाई केली. यावेळी संशयिताकडे सुमारे २६ हजार ५०० ची गोवा बनावटीची अवैध दारू सापडली. या घटनेच्या अधिक तपास विजयदुर्ग पोलीस करत आहेत.