शुभ्रा अंधारी तालुक्यात द्वितीय

वेंगुर्ला,दि.५ एप्रिल

सिधुदुर्ग जि.प.तर्फे घेतलेल्या ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा २०२४ मध्ये वेंगुर्ला शाळा नं.१ची विद्यार्थीनी कु.शुभ्रा सदाशिव अंधारी हिने ८७ टक्के गुण तसेच ब्रेन डेव्हलपमेंट २०२४ या परीक्षेत ६२ टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात द्वितीय आली आहे. तिला वर्गशिक्षक गायत्री बागायतकर यांचे मार्गदर्शन लाभले.