सावंतवाडी दि.४ एप्रिल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी भाजपाच्या कार्यालयात आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. लोकसभा निवडणूकीत भाजपचा उमेदवार विजयी होण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली पाहिजे असे निर्देश दिले.
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब आणि जिल्हा भाजपचे सरचिटणीस व जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरेगावकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजपचे आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, बांदा अध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे,,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.रेश्मा सावंत, जिल्हा परिषद चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, सौ. दिपाली भालेकर,पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, संतोष गांवस, महिला शहर अध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, संदिप
नेमळेकर, सरपंच संघटना अध्यक्ष हनुमंत पेडणेकर, मंदार कल्याणकर, मकरंद तोरसकर, विराग मडकईकर, बंटी पुरोहित, गुरू सावंत, गुरू मठकर,मिसबा शेख, आंबोली मंडल अध्यक्षा प्राजक्ता केळुसकर,केतन आजगांवकर, विनोद सावंत, दिलीप भालेकर, अजय सावंत, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे,
मडुरा उपसरपंच बाळू गावडे, चराठा उपसरपंच अमित परब, आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर,मधुकर देसाई, दादा परब, संतोष पालयेकर, कोलगांवचे माजी सरपंच संदीप
हळदणकर, आत्माराम गावडे यांसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.