मालवण,दि.०४ एप्रिल
तारकर्ली गावातील मुलांनी शिमगोत्सव काळात घरोघरी शिमगा खेळून शबाय म्हणून मिळालेली रक्कम अविनाश चंद्रकांत धुरत आणि बबन लोणे या आजारपणाने त्रस्त असलेल्या कुटुंबाला मदत म्हणुन सुपूर्द केली. त्यामुळे या कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे. या बाळगोपाळानी यापूर्वीही अशाचप्रकारे काही कुटुंबाना मदत असून सलग सहाव्या वर्षी त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.
या बाळगोपाळांमध्ये रोहन नरेश कांदळगावकर, यज्ञेश वंदन केरकर, ईशान सदाशीव सागवेकर, निनाद गणपत मोंडकर, रिषभ श्रीधर खराडे, हार्दिक सतिश टिकम, नैतिक धोंडी कांदळगावकर, रोहित बाळकृष्ण वरक, वरुण तांडेल, दत्तारज शिवाजी पाटकर, आरव धोंडू कांदळगावकर, मृणाल दाजी सारंग यांचा समावेश आहे.
यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी गावातील निराधार आणी गरजु व्यक्तींना आर्थिक मदत केली होती. या कामाची शाबासकी म्हणून त्यांना नवी मुंबई येथील साईवेद स्पोर्ट्सचे संचालक श्री. संजय तारी यांनी मोफत जर्सी उपलब्ध करून दिली होती तर सौदी अरेबिया येथे वास्तव्यास असलेल्या प्रदिप तोंडवळकर यांनी ५००० रूपयांचे प्रोत्साहनात्मक बक्षिस पाठवले होते. हे बाळगोपाळ गेली सहा वर्षे सातत्याने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असल्याने सध्या तारकर्ली पंचक्रोशीत ते कौतुकाचा विषय ठरत आहेत.