मालवण,दि.५ एप्रिल
कोळंब लाडवाडी येथील कुलस्वामिनी आई महादेवी व आकाराचे नूतन देवालय साकारले आहे. या निमित्ताने कुलस्वामिनी आई महादेवीची पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण आणि त्रैवार्षिक होमहवन व सत्यनारायण महापूजा दि. २४ ते २६ एप्रिल रोजी होणार आहेत.
यानिमित्त दि. २४ रोजी कलश व देवीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. २५ रोजी देवीची प्राणप्रतिष्ठापना, धार्मिक विधी, सायंकाळी महेश धामापूरकर यांचे कीर्तन, रात्री रेकॉर्ड डान्स होणार आहेत. दि. २६ रोजी प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व ध्वजारोहण होणार आहे. रात्री ९.३० वा. महापुरुष कलावैभव दशावतार नाट्य मंडळाचा ‘महिमा वराही देवीचा’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे