कणकवलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात रेडकू गतप्राण

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव बंदोबस्त करा,नागरिकांची मागणी

कणकवली दि.५ एप्रिल(भगवान लोके)

कणकवली, टेंबवाडी परिसरात एका म्हशीच्या रेडकूवर शुक्रवारी भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यामुळे कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा एकदा समोर आला आहे. कणकवली नगरपंचायतचे मुख्याधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहतील काय? असा सवाल शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे. तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपंचायत प्रशासनाने करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कुत्र्यांनी रेडकुवर हल्ला करत त्याचे लचके तोडले. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने ते गतप्राण झाले.भटके कुत्रे इतर प्राण्यांबरोबरच माणसांवर हल्ला करण्याच्या घटना वाढत असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.