कुडाळ,दि.०६ एप्रिल
इयत्ता चौथी मधून कु. दूर्वा रवींद्र प्रभू हिने 91 गुण मिळवून जिल्ह्यात पहिला व देशात सातवा येण्याचा मान मिळवला आहे व तिला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
तसेच कु. करुण्या निलेश परब हिला 86 गुण मिळाले असून तिला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. सुयश शिवाजी पवार याला 83 गुण मिळून रौप्यपदक मिळाले आहे. तसेच चिन्मय कौशल तेंडोलकर याला ७४ गुण प्राप्त झाले असून कांस्यपदक मिळाले आहे.
इयत्ता तिसरी मधून समर्थ लक्ष्मण आगलावे याला 91 गुण मिळून सुवर्णपदक प्राप्त झाले. कु. निहारिका वामन म्हापणकर हिला ८६ गुण मिळून कांस्यपदक प्राप्त झाले आहे. तसेच कु. निशी मिथुन ठक्कर हिला 85 गुण प्राप्त झाले असून कांस्यपदक आहे.
इयत्ता दुसरी मधून कु. गार्गी स्वप्नील तेरसे हिला 89 गुण मिळाले असून कांस्यपदक प्राप्त झाले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पालक, शिक्षक व सौ. सुवर्णा विजय प्रभू तेंडोलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.


