मालवण,दि.६ एप्रिल
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मालवण नगरपालिका हद्दीतील नागरिकांना विहीत पद्धतीने मालमत्ता व पाणीपट्टी ‘कर मागणी देयके बजावून तसेच वेळोवेळी जाहीर आवाहन करून मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुली करीत पर्यवेक्षकांची नेमणूक करून वसुलीची कार्यवाही करण्यात आली आहे. मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या वसुली पथकाकडून शहरातील एकूण ३६ मालमत्तांना सील करून ६ लाख २० हजार थकीत कराच्या मालमत्ता गोठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती नगरपालिकेतर्फे देण्यात आली.
मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता व पाणीपट्टी वसुली पथकातील रविराज खतरकर, महेश परब, सोनाली हळदणकर, सुधाकर पाटकर, श्रद्धा आरेकर, राजा केरिपाळे, भास्कर राऊळ, बस्त्याव फर्नांडिस, अनिकेत चव्हाण, सचिन कासले, विश्राम जाधव, बाळकृष्ण जाधव, हेमंत आचरेकर, नितीन कोयंडे, वीणा पारधी, रेश्मा परुळेकर, वैभवी तांडेल, खेमराज सावंत, सदाशिव घाडीगावकर, संदीप घाडी, हर्षा थोटम, सुनील कदम व इतर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व इतर करांची वसुली ९०.२० टक्के व पाणीपट्टी कराची ९७ टक्के वसुली करण्यात आली आहे.
मालवण शहरवासीयांनी सजगतेने मालमत्ता व पाणीपट्टी कर भरून नगरपालिकेला सहकार्य केल्याबद्दल मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी मालवण शहरातील नागरिकांचे आभार मानले आहेत.