ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान तपोभूमी, मुळदे येथे रामनवमी उत्सवाचे आयोजन

कुडाळ,दि.६ एप्रिल
कुडाळ तालुक्यातील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान तपोभूमी, बामणादेवी रस्ता, मुळदे ९ ते १७ एप्रिल या कालावधीत श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. ९ एप्रिल या दिवशी सकाळी १० ते ११ गुढीपूजन आणि पंचांग वाचन, ११ ते दुपारी १२ नवनाथ ग्रंथ पारायणची घटस्थापना, सायंकाळी ६ वाजता नवनाथ ग्रंथ पारायणास प्रारंभ करण्यात येणार आहे. १७ एप्रिल या दिवशी सकाळी १० वाजता ह.भ.प. माळकर बुवा यांचे रामजन्मोत्सवाचे कीर्तन, दुपारी १२.३० वाजता रामजन्म सोहळा, दुपारी १ ते २.३० महाप्रसाद, २:३० ते ३:३० श्री. वासुदेव सडवेलकर बुवा, आंदुर्ले यांचे भजन; सायंकाळी ६ ते ७ निवजेकर प्रासादिक भजन मंडळ निवजे (पिंगुळकर बुवा) यांचे भजन, सायंकाळी ७.३० वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा, ७ ते ९ वेताळबांबर्डे, कदमवाडी यांचा हरिपाठ, असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवनाथ उपासक प.पू. बाळकृष्ण घडशी महाराज यांनी केले आहे.