डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

मालवण,दि.०६ एप्रिल

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मालवण तालुक्यातील कट्टा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी व नववी ते बारावी या दोन गटात होणार आहे. स्पर्धेसाठी गट पाचवी ते आठवी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाती निर्मूलनाचा लढा (वेळ ५ ते ६ मिनिटे), गट नववी ते बारावी- भारतीय राज्यघटनेच्या आदर्शाना जपण्यात तरूणांचे योगदान (वेळ ६ ते ८ मिनिटे) असे विषय देण्यात आले आहेत.
स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना प्रत्येक गटासाठी प्रथम क्र. १००० रू., द्वितीय क्रमांक ७०० रू., व तृतीय क्रमांक ५०० रू. तसेच सन्मान चिन्ह व पुस्तक भेट संविधानाची प्रास्ताविका, वही पेन इ. स्वरूपात पारितोषिक देण्यात येईल. तसेच स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील. स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे दि. ९ एप्रिल पर्यंत स्पर्धा संयोजक यांच्या जवळ द्यावीत. अधिक माहितीसाठी आर.डी.चेंदवणकर 9970507608, सुनील जाधव 9421921898 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.