सर्वसामान्यांचे किरण सामंत हेच उमेदवार असावेत!

शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने वरिष्ठांकडे मागणी

कुडाळ,दि.०८ एप्रिल

शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने संजय आग्रे (शिवसेना जिल्हाप्रमुख), रुपेश पावसकर (जिल्हा संघटक), वर्षा कुडाळकर महिला जिल्हाप्रमुख, बबन शिंदे कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख, विश्वास गावकर, कुडाळ मालवण विधानसभा उपजिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख योगेश (बंटी) तुळसकर, तालुकाप्रमुख
अरविंद करलकर यांनी कुडाळ तालुक्यात सर्व विभागनिहाय दौरा करून कुडाळ तालुक्यातील ९ विभागात बैठका घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तसेच शिवसेना पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळून त्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत अशा सूचना करण्यात आल्या. यावेळी सर्व विभागातील कार्यकर्त्यांनी शिवसेना उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करून विजयी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षालाच उमेदवारी मिळावी तसेच किरण (भैय्या) सामंत हेच उमेदवार म्हणून मिळावेत आशी सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मागणी केली. तसेच भैय्या सामंत हेच सर्वसामान्यांचे नेतृत्व आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत तसेच सर्व सामन्यात मिसळून काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. सर्वसामान्यांचे किरण सामंत हेच उमेदवार असावेत तसेच तेच उमेदवार म्हणून निवडणुकीत विजयी होऊ शकतात असे मत आहे.
ही सर्वांची मागणी आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवून आपली मागणी पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि त्यांना विजयी करूया असे एकमताने ठरविण्यात आले.