सावंतवाडी दि.८ एप्रिल
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी च्या वतीने यंदापासून श्रीराम वाचन मंदिर माजी अध्यक्ष कै अॅड दीपक दत्ताराम नेवगी यांच्या नावाने पुरस्कार देण्यात पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले असून यंदा चा पहिलाच नेवगी स्मृति पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांना घोषित करण्यात आला आहे.
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी आणि स्व. दीपक नेवगी कुटुंबीयांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता वर्धापन दिन समारंभ आयोजित करण्यात आला असून श्रीरामाचे मंदिरला १७२ वर्षे पूर्ण होत आहेत.याचे औचित्य साधून अँड दीपक दत्ताराम नेवगी स्मृति पुरस्कार श्री गजानन नाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे
यावेळी व्याख्याते विवेक मेहेत्रे (मुंबई ) असून “ती गेली कुठे ?” या विषयाची ते मांडणी करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. जी ए बुवा असतील. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम वाचन मंदिर चे अध्यक्ष प्रसाद पावसकर,कार्याध्यक्ष अँड संदीप निंबाळकर व कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.