ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मेडल धारक व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी कौतुक करून या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा

सावंतवाडी दि.८ एप्रिल

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत मेडल धारक व उत्तीर्ण झालेल्या माजगाव चिपटेवाडी प्राथमिक शाळा नं ५ मधील विद्यार्थ्यांचे सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनी कौतुक करून या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजगाव केंद्राचे केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत यांनीही या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा पवित्रा धुरी, पालक एल एस निचम तसेच शाळेच्या शिक्षिका श्रीम दळवी उपस्थित होत्या. यावेळी एल एस निचम यांनीही शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.