स्वामीभक्त ठाकूर मामा परिवारा कडून महेश इंगळेंचे औक्षण

५० व्या वाढदिवसाप्रित्यर्थ ५१ प्रकारच्या मिठाईची मेजवानी

मसुरे, दि.१६ जानेवारी (झुंजार पेडणेकर)

बदलापूरचे निस्सीम स्वामीभक्त चंद्रकांत ठाकूर उर्फ ठाकूर मामा, ठाकूर मामी परिवार यांच्या वतीने अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन ओवाळणी व औक्षण करण्यात आले. या प्रसंगी ठाकूर मामा मित्र परिवाराच्या वतीने महेश इंगळे यांना ५१ प्रकारच्या खाद्य मिठाईची मेजवानी भेट देऊन विशेष उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, स्वामीभक्त चंद्रकांत ठाकूर मामा, ठाकूर मामी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, सोमदत्त असोलकर, विपुल जाधव, गिरीश पवार, श्रीकांत मलवे व चंद्रकांत ठाकूर मामा परिवारातील सदस्य उपस्थित होते.