दोडामार्ग, दि.८ एप्रिल
दोडामार्ग ते अस्नोडा गोवा मार्गावर कासारपाल गोवा येथे सोमवारी रात्री साडेसात वाजता झालेल्या कार मोटार सायकल अपघातात मोटार सायकल वरील युवक
तसेच कार मधिल महिला
गंभीर जखमी झाला तर कार रस्ता सोडून घडणीत जाऊन पडली. या अपघातामुळे या मार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली तिन्ही जखमींना उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. घटनास्थळी गोवा दोडामार्ग पोलिसांनी पंचनामा करून मोटार सायकल बाजूला केली.
दोन्ही वाहने गोवा येथील आहेत कार मधिल व्यक्ती ही दोडामार्ग येथे गेली होती ती परत नानोडा येथे जात होती तर मोटार सायकल युवक जो खाजगी सुरक्षा रक्षक आहे तो दोडामार्ग येथे जात होता कासरपाल गोवा येथे एका वळणावर कारला जोरदार धडक दिली. यात कार मधिल महिला तसेच चालक जखमी झाला तर मोटार सायकल युवक जखमी झाला. दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे.