सावंतवाडी बाहेरचा वाडा येथे एका अल्पवयीन मुलीवरती कुत्र्याने हल्ला

सावंतवाडी दि.१५ जानेवारी 
सावंतवाडी बाहेरचा वाडा येथे एका अल्पवयीन मुलीवरती कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला. लहान मुलांवर हल्ला केल्याने नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांना आवरावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

या कुत्र्यांचा बंदोबस्त सावंतवाडी नगर परिषदेने करणे आवश्यक आहे शहरात ठिकठिकाणी बेवारस कुत्रे हैदोस घालत आहेत त्याचा फटका स्थानिक नागरिक गरिबांना बसत आहे काही शौकीन कुत्री पाळतात ते कुत्रे सकाळ फिरवत असताना विष्ठा रस्त्याच्या मध्यभागी असते. या नागरिकांना सांगणे मुश्किल झालेले आहे अशाही कुत्र्यांना बंधन असायला हवे तसा कायदा आहे परंतु सावंतवाडी नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात याबाबत हौशी पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी सकाळी कुत्र्यांना रस्त्यात विस्टा करायला भाग पडतात यांच्यावरती कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सॅनिटरी इन्स्पेक्टरने वैभव नाटेकर यांना आम्ही बरेच वेळा कल्पना दिली आहे मोकाट कुत्रे आणि रस्त्यावरील कुत्र्यांची विस्टा याच्यावरती नगरपरिषदेला कारवाई करायला जमत नसेल तर नगरपरिषदेच्या विरोधात कडक भूमिका आम्हाला घ्यावी लागेल मॉर्निंग फिरणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे तात्काळ कारवाई करा अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.