सावंतवाडी,दि.९ एप्रिल
सुर्य आग ओकतोय, उन्हाचे चटके बसत आहे. जंगलातील वन्यप्राणी पाण्यासाठी वणवण भटकत असताना शहरात येत आहेत. सावंतवाडी सालईवाडा गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा गवा रेडे लोकवस्तीत घुसले. आज पाच गवा रेडे भरवस्तीत सालईवाडा परिसरातील श्री महाडेश्वर यांच्या घराजवळ दिवसाढवळ्या दिसले.
सालईवाडा परिसरात श्री महाडेश्वर यांच्या घराजवळ पाच गवा रेडे दिसले. ते पाण्यासाठी वणवण भटकत असताना लोकवस्तीत आले होते.बराच वेळ घुटमळत होते. अन्न आणि पाणी जंगलात नसल्याने ते लोकवस्तीत घुसत आहेत.
नरेंद्र डोंगरावर सध्या वन सहलीला लोक जातात. यापेक्षा वनखात्याने पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे असे बोलले जात आहे. सालईवाडा परिसरात पाच गवा रेडे दिवसाढवळ्या दिसले त्यामुळे लोक भयभीत झाले आहेत.