मालवण,दि.९ एप्रिल
मालवण वायरी येथील जागृत देवस्थान कुलस्वामिनी श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रौत्सव रविवार दिनांक १४ एप्रिल ते मंगळवार दिनांक १६ एप्रिल रोजी संपन्न होत असून या वार्षिक जत्रोत्सवाच्या निमित्ताने या जत्रेच्या पूर्व तयारीसाठी समस्त मयेकर बंधू मंडळ मुंबईचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुंबईकर चाकरमानी मालवणात दाखल झाले आहेत
समस्त मयेकर बंधुची कुलस्वामिनी असलेल्या आणि असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिलेल्या मालवण वायरी येथील श्री देवी केळबाईच्या वार्षिक जत्रौत्सवास १४ एप्रिल पासून सुरुवात होत असून तीन दिवस चालणाऱ्या या वार्षिक जत्रौत्सवाच्या निमित्ताने पूर्व तयारीसाठी समस्त मयेकर बंधुसह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची लगबग वाढली आहे.
रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महापुरुष प्रासादिक भजन मंडळ भोगवे यांचे सुश्राव्य भजन. रात्रौ ७ वाजता बुवा भगवान लोकरे यांचे दत्त प्रासादिक भजन मंडळ मुंबई विरुद्ध बुवा प्रमोद हर्याण यांचे पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ मुंबई यांची डबलबारी भजन ठेवण्यात आले आहे. सोमवार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता समुद्र स्नानाकरिता देवीची सवाद्य पालखी मिरवणूक, दुपारी १२ वाजता श्री केळबाई देवीला कलशस्नान व पूजा, दुपारी २ वाजता चैत्र शुद्ध सप्तमी महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजता श्री केळबाई देवी प्रासादिक भजन मंडळ, मुंबई यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ९:३० वाजता रेकॉर्ड डान्स. मंगळवार दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता श्री मूर्तीवर पंचामृत अभिषेक व स्नान, दुपारी १२ वाजता होम हवन, दुपारी १ वाजता चैत्र शुद्ध अष्टमी प्रसाद, सायंकाळी ७ वाजता स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम, रात्रौ ९ वाजता आई केळबाईची आरती, रात्रौ १० वाजता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा, रात्रौ ११ वाजता दत्त माऊली दशावतार मंडळ, दाभोली वेंगुर्ले यांचे दशावतारी नाटक.
रविवारी १४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आई केळबाई देवीचे नामस्मरण, सोमवार १५ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत केळबाई देवी मंदिरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने व डॉ. अनिता आशिष मयेकर, मुंबई यांच्या सहकार्याने सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ या वेळात श्री केळबाई मंदिरामध्ये वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन समस्त मयेकर बंधु मंडळ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.