एसटी आगार प्रमुख गावित यांची एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेत विविध समस्यांवर केली चर्चा

सावंतवाडी,दि.१६ जानेवारी
सावंतवाडी एसटी आगार प्रमुख गावित यांची एसटी कामगार सेनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेत विविध समस्यांवर केली चर्चा*
महिला कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या तक्रारी च निवारण करण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली तसेच विभाग कार्यालयाकडून मनमानी पद्धतीने देण्यात येणाऱ्या आदेशांमुळे स्थानिक प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात अडचणी निर्माण होत आहेत यासाठी योग्य नियोजन करावे.कर्मचारी यांना त्रास न होता प्रशासनास सहकार्य करण्यास आम्ही तयार असल्याची ग्वाही तालुकाप्रमुख श्री आबा सावंत यांनी आगार प्रमुख श्री गावित यांना दिली,तसेच जिल्हा समन्वयक श्री बाळा गावडे यांनी आगार व्यवस्थापक यांचं कायम सहाकार्य कर्मचाऱ्यांना असत यासाठी श्री गावित यांचं अभिनंदन केलं आणि या पुढेही असच सहकार्य राहावं अशी इच्छा व्यक्त केली.
*यावेळी एसटी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री अनुप नाईक, जिल्हा समन्वयक श्री बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख शब्बीर मणियार,एसटी कामगार सेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख आबा सावंत, महिला तालुका संघटक सौ भारती कासार,शहर संघटिका सौ श्रृतिका दळवी,एसटी स्टँड इन्चार्ज शेवाळे, महिला कर्मचारी निकिता चितारी,के.के.जोशी,एस कदम, आगार अध्यक्ष अमित आडके, सचिव उल्हास चव्हाण, अमित तेली,एम बी गावडे,एस पी घाडी,आर एम कोलगावकर आदी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.