सावंतवाडी शहरात आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत ;महिलांच्या आरंभ सखी ग्रुपच्या ढोलपथकाने सांस्कृतिक कलाविष्कार

सावंतवाडी,दि.९ एप्रिल

शहरासह तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाने नववर्षाचे स्वागत करण्यात आले गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिवाजी राजा शिवाजी चौक सबनीसवाडा बाळ गोपाळ मित्र मंडळ तसेच माजगाव गोठण या ठिकाणी श्री सत्यनारायण पूजन उत्सवाचा कार्यक्रम झाला तर यावर्षी आरंभ सखी ग्रुप महिला ग्रुपच्या वतीने ढोलपथकासह सांस्कृतिक कलाविष्कार आणि चिमुकल्यांचा वारी देखावा सर्वांनाच भावला
सावंतवाडी शहरांमध्ये संस्थानच्या राजवाड्याच्या ईस्टर गेट प्रवेशद्वारावर युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते आणि सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब शुभदा देवी भोसले यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आरंभ महिला ग्रुपच्या ढोल पथकाचा शुभारंभ करण्यात आला

गुढीपाडव्यासाठी आरंभ सखी ग्रुप तर्फे महिला ढोल पथक

सावंतवाडीत प्रथमच गुढीपाडव्यानिमित्त “आरंभ सखी” ग्रुप तर्फे महिला ढोल पथकासह महिला बाईक रॅली आयोजित करण्यात आली. या शोभायात्रेची सुरुवात गुढीपाडव्या दिवशी सावंतवाडी संस्थानाच्या राणीसाहेब हर हायनेस शुभदादेवी भोंसले तसेच युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या शुभहस्ते झाला.
हे महिलांचे ढोल पथक श्रीरामवाचन मंदिर , गांधी चौककडून मार्गस्थ होत या यात्रेचा जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानाकडे समारोप झाला. या शोभायात्रेत सावंतवाडीतील महिलांचे ढोल पथक, महिलांचे लेझीम पथक ,लाठीकाठी ,पोवाडा ही विशेष आकर्षणे होती. तरी या शोभायात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बाईक रॅलीमध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषेत माजी नगरसेविका अन्नपूर्णा कोरगावकर सहभागी झाल्या होत्या आरंभ सखी ग्रुपचे सदस्य देवता हावळ ,दर्शना रासम, प्रज्ञा नाईक, नेहा माडगावकर, पल्लवी रेगे, संजना देसकर स्मिता नार्वेकर ,संगीता शेलटकर,भारती देशमुख यांनी परिश्रम घेतले.
यावेळी बाईक रॅली तसेच छोट्या बालकाने वारी देखावा पालखी सोहळा साजरा केला बाईक रॅली आणि ढोल पथक राजवाड्यापासून निघाल्यानंतर श्रीराम वाचन मंदिर तसेच गांधी चौक या ठिकाणी नृत्यविष्कार झाला यामध्ये अटल प्रतिष्ठानच्या चिमुकल्याने पंढरीच्या वारीचा आणि पालखी देखावा सादर केला हरिनामाच्या गजरात ही पंढरीची वारी सावंतवाडी शहरातून निघाली होती त्यानंतर हे ढोल पथक बाजारपेठेतून जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानाकडे येऊन पथकाची सांगता झाली
शहरातील राजा शिवाजी चौक तथा गवळी तिठा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी कोल्हापूरच्या महालक्ष्मी चा हलता देखावा ठेवण्यात आला तर बाळ गोपाळ मित्र मंडळ सबनिस वाडा या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराजांचा हलता देखावा साकारण्यात आला होता सावंतवाडी शहरासह कोलगाव दरवाजा, चितार आळी, संत गाडगेबाबा भाजी मंडई आणि माजगाव गरड या ठिकाणी सत्यनारायण पूजा दरवर्षीप्रमाणे करण्यात आली आहे