सावंतवाडी,दि.९ एप्रिल
मॉरिशस मध्ये स्थायिक मूळ भारतीय बांधव व मराठी प्रेमी बांधव यांचे मॉरिशस हुन १४ एप्रिल २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होणार असून मॉरिशस हुन येणाऱ्या या मराठीप्रेमी बांधवाचे कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने थाटात स्वागत करण्यात येणार असून, मॉरिशहून येणाऱ्या मराठी प्रेमी बांधवाच्यावतीने आपल्या भास्तीय संस्कृतीवर, व मराठी पंरपरेवर आधारीत विशेष कलाविष्कार सादर केले जाणार आहेत.
या सुवर्ण संधीचा लाभ सर्व साहित्य व कला प्रेमीनी घ्यावा झसे आवाहन कोमसापचे जिल्हाध्यक्ष श्री मंगेश मसके यांनी केले आहे. सदर स्वागत समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील कसाल मुक्कामी श्री देव पावनाई मंदिरांच्या प्रांगणातील रंगभूमीवर रात्रौ सादर केले जाणार असून या स्वागत व सांस्कृतिक समितीचे नेतृत्व कोमसापच्या वतीने केले जाणार आहे.
या समितीचे श्री रुजारीयो पिंटो, श्री. संदीप वालावलकर श्री. चिराग नदिकर श्री भरत गावडे, विठ्ठल कदम , सुरेश ठाकूर, संतोष सावंत, वृंदा कोनळी हे कोमसाप पदाधिकारी करणार असून यावेळी मॉरिशस बंधुचा कोमसापच्या वतीने जाहीर सन्मानही केला जाणार आहे.
अलिकडेच भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या प्रेरणेतून कोमसापचे साहित्य संमेलन मॉरिशस मध्ये संपन्न झाले या वेळी कोमसापच्या मार्फत अनेक मान्यवर साहित्यिक, पदाधिकारी व साहित्य प्रेमी यांनी या संमेलनात सहभाग घेत्र मॉरिशस देशाचा दौरा केला होता, या वेळी मॉरिशस मधील मूळ भारतीय मराठी बांधवानी, आपल्या भारतीय भूमी’ व मराठी संस्कृती बद्दल दाखवलेली ओढ भारत सरकार व मॉरिश सरकार व दोन देशाचे संबंध अधिक दृढ करणारी ठरली, यावेळी मॉरिश बांधवानी साहित्य संमेलनात सादर केलेले कलाविष्कार संस्मरणीय होणार आहे.
या समारंभाच्या पूर्व नियोजनासाठी कोमसाप जिल्हा कार्यकारणीची बैठक जिन्हा ग्रंथालयात संपन्न झाली. या वेळी कोमसाप. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीचे रुजरियो पिंटो, भरतगावडे, वृंदा कांबळी, विठ्ठल कदम,, गुरु ताम्हणकर, सुरेश पवार, डॉ. एस टी, आवटे, विजय पालकर हिपक म्हाडदळकर, ऋतुजा केळकर, डॉ. दिपाली काजरेकर आदी उपस्थित होते.