बांदा,दि.१० एप्रिल
मुंबई-गोवा महामार्गलगत इन्सुली-खामदेव नाका परिसरात असलेल्या एका टायर दुकानाला आग भीषण आग लागण्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी रात्री 9.15 वाजता घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने ग्रामस्थांना आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. आगीने पूर्ण दुकानाला वेढल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंगळवारी गुढीपाडवा असल्याने दुकान बंद होते. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकानात टायर मोठ्या संख्येने असल्याने आग भडकली. आगीच्या ज्वाळा महामार्गावर लांबपर्यंत दृष्टीस पडत होत्या. स्थानिकांनी पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने ग्रामस्थांचे प्रयत्न तोकडे पडले. अग्निशमन बंबाला पाचरण करण्यात आले होते.