बॅ.खर्डेकर महाविद्यालयात प्लेसमेंट कॅम्प

वेंगुर्ला,दि.१६ जानेवारी

बी.ए.बी.कॉम, बी.एस्सी तृतीय वर्षामध्ये शिकत असलेल्या व महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता आयसीसीआय बँकेच्या प्लेसमेंट सेल मार्फत आणि ग्लोबल टॅलेंट डेव्हल्पमेंट कंपनी एनआयआयटी व बी.एफ.एस.आय यांच्यावतीने महाविद्यालयाने आपणास नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी डॉ.बी.जी.गायकवाड (९८५०९४४९२८) यांच्याशी १७ जानेवारी पर्यंत सकाळी ८ ते १० या वेळेत संफ साधावा.

या प्लेसमेंट कॅम्पला उपस्थित राहणा-या विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी तसेच डिग्रीचे मार्कशिट घेऊन यावे. जे विद्यार्थी यावर्षी तृतीय वर्षात शिकत आहेत त्यांनी द्वितीय वर्षाचे मार्कशिट घेऊन यावे.