श्री स्वामी समर्थ मठात भक्तांची मांदियाळी
देवगड,दि.१० एप्रिल
देवदूत कै. अभिषेक गावकर श्री स्वामी समर्थ मठ मिठमुंबरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला.या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यात स.७ते ८ श्री स्वामी समर्थ पूजा ,स.८ ते १० या वेळात अभिषेक,मंदिराचे प्रमुख आत्माराम गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. स.१० ते १२ श्री स्वामी समर्थ नामजप,त्यानंतर श्रीं ची आरती दर्शन,महाप्रसाद पार पडला.
त्यांनंतर बुवा प्रणय घाडी याचे भजन,सायंकाळी कलाप्रेमी प्रस्तुत अभंगवाणी हा सौ.,मनस्वी घारे व सहकारी याच्या गायनाचा कार्यक्रम,तसेच भजने,बुवा गुणाजी कोयंडे, बुवा विघ्नेश तारी यांचे भजन आयोजित केले आहे.भाविकांनी सकाळ पासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या..
देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी या सोहळ्यास भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले.त्यांच्या समवेत पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण ,पोलीस नाईक प्रवीण सावंत ,पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील,स्वप्नील ठोंबरे, श्री. नाटेकर ,देवगड जामसंडे नगरपंचयत कर्मचारी,देवगड पंचायत समिती अधिकारी कर्मचारी स्थानिक भाविक भक्तगण यांनी श्रीचे दर्शन घेतले.