मोचेमाड येथे प्रभू रामचंद्रांच्या प्रतिकृतीचे पूजन

वेंगुर्ला,दि.१६ जानेवारी

अयोध्येत २२ जानेवारीला होणा-या प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून मोचेमाड येथील गिरोबा मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिकृतीचे पूजन होणार आहे.

यानिमित्त सकाळी ८ वाजता गिरोबा शिवलिगावर अभिषेक, प्रभू रामचंद्रांच्या प्रतिकृतीतीचे पूजन आणि नामस्मरण, ९ वाजता प्रभू रामचंद्रांची नामजप मिरवणूक, ११ ते १.३० पर्यंत प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अयोध्येतून थेट प्रक्षेपण आणि नामजप, १.३० ते ३ महाआरती व महाप्रसाद, ३ ते ६ हळदीकुंकू समारंभ व महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळ, सायंकाळी ६ ते ८.३० मंदिराभोवती दीपप्रज्वलन व रात्रौ ८.३० ते १०.३० सोन्सुरे येथील वारकरी खेळांसह भजन होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.