आरपीडी हायस्कूलमध्ये क्रीडा समाज स्पर्धेचे आयोजन सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

सावंतवाडी दि.१० एप्रिल
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याशी विद्यमाने १७ ते ३० एप्रिल या कालावधीत इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा समर कॅम्प राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी या प्रशालेत आयोजित करण्यात आला आहे.

हा कॅम्प सकाळी आठ ते दहा या वेळेत घेण्यात येणार आहे यात विविध प्रकारचे खेळ क्रिकेट, बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन, कॅरम, रोल बॉल, मल्लखांब आदी घेण्यात येणार आहेत तसेच क्रीडासमर कॅम्पसाठी कोणत्याही शाळेतील मुले मुली सहभागी होऊ शकतात. किडा समर कॅम्प निशुल्क असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ज्या विद्यार्थ्यांनी या कॅम्प साठी सहभागी व्हायचे आहे त्यांनी क्रीडा शिक्षक सागर सुरेश सावंत ९४०३५९१९९९ व रामकृष्ण अंकुश सावंत ७३५०५८३५२१ यांच्याकडे नाव नोंदणी १५ एप्रिल पर्यंत करावी असे आवाहन करण्यात आले आहे .
या समर कॅम्पचा मार्गदर्शक बुद्धिबळ व कॅरम साठी कौस्तुभ पेडणेकर , मल्लखांब साठी रणवीर सावंत असतील. राणी पार्वती देवी हायस्कूल व जुनियर कॉलेजच्या पटांगणावर हा कॅम्प होईल या कामचे उद्घाटन बुधवार दि.१७ एप्रिल रोजी सकाळी ठीक नऊ वाजता होईल असे कळविण्यात आले आहे.