“सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत शिल्पग्राम परिसर, सावंतवाडी या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम”

सावंतवाडी,दि.१६ जानेवारी
सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत दि.१८ जानेवारी रोजी सकाळी ठिक ७ वाजता शिल्पग्राम परिसर सावंतवाडी या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी दिली.ं
तसेच शहरातील विविध मंदिर परिसरांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहीमेअंतर्गत रस्ते, गटारे, नाल्यांचे प्रवाह स्वच्छ करण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद सहभागी होणार आहेत. तरी शहरातील जास्तीत जास्त स्वच्छता प्रेमी नागरीकांनी संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहीमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे यांनी केले आहे.