श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड या मठाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

केंद्रीय मंत्री नारायण राणे ,आमदार नितेश राणे ,शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी घेतले स्वामींचे दर्शन

 देवगड,दि.१० एप्रिल

श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड या मठाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा १० एप्रिल २०२४ रोजी संपन्न होत आहे.या निमित्ताने श्री स्वामी समर्थ मठ हडपीड- देवगड येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी संत पीठाचे अधिष्ठान विठू माउली संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत पुंडलिक,संत गोरा कुंभार, संत नामदेव या संत सत्व दर्शन सोहळा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बुधवारी सकाळी पासून स्वामी भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या .केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सह कुटुंब श्री चे दर्शन घेतले यावेळी सौ निलमताई राणे,आम.नितेश राणे उपस्थित होते.त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी श्री चे दर्शन घेतले या प्रसंगी त्यांचा सन्मान करण्यात आला.
या पाचव्या प्रकटदिन व मठाच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.