सावंतवाडी दि.१६ जानेवारी
आंबोली घाटातील कामात झालेल्या अपहाराबाबत आवाज उठविणार्या माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या विरोधात कट रचणार्या बांधकाम अधिकार्यांसह ठेकेदारांची चौकशी करण्यात यावी, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आज सावंतवाडीतील माजी नगरसेवकांच्या व साळगावकर यांच्या मित्रमंडळाकडून सावंतवाडी पोलिसांकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे दिले आहे. तसेच या प्रकारामागे नेमके कोण? याचा शोध घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. आज माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर, सुधीर पराडकर, बावतीस फर्नांडीस, विद्याधर गावडे, प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.
श्री. साळगावकर यांनी कामाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केल्यानंतर एका प्लांटवर झालेल्या पार्टीत साळगावकर यांना मारण्याचा कट रचण्यात आला होता. हा प्रकार समजल्यानंतर श्री. साळगावकर यांनी पत्रकार परिषद घेवून चौकशीची मागणी केली होती. मात्र आपल्याकडे तशा कोणत्याही प्रकारची तक्रार नाही, असे पोलिसांचे म्हणणे होते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळाली नव्हती. आज या ठिकाणी संबंधितांकडून निवेदन देण्यात आले असून या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग साळगावकर यांच्या विरोधात कट रचणार्या बांधकाम अधिकार्यांसह ठेकेदारांची चौकशी करण्यात यावी