डोंबिवली कोकणवासीय मित्र मंडळातर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

डोंबिवली,दि.१६ जानेवारी
गाबीत, क्षत्रिय मराठा, आरमारी मराठा, दर्यावर्दी मराठा, गोमंतक क्षत्रिय मराठा यांना एकत्रित घेऊन कोकणवासीय मित्र मंडळ आपले ३६ वे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी दि. २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सर्वेश सभागृह, डोंबिवली (पूर्व )येथे संपन्न होणार आहे. परस्परांच्या ओळखीतून स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा व कौटुंबिक जिव्हाळा निर्माण व्हावा या उद्देशाने गेली कित्येक वर्षे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा . यासाठी वेशभूषा स्पर्धा, रंगारंग कला स्पर्धा घेण्यात येणार असून तसेच वार्षिक परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने कोकणवासीयांनी वार्षिक स्नेहसंमेलनास उपस्थित राहावे असे अध्यक्ष अशोक पांडुरंग चोपडेकर, सचिव रत्नाकर सहदेव सारंग, खजिनदार बापू लुमाजी कुबल यांनी संयुक्तिक आवाहन करण्यात आले आहे.