केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अबिद नाईक यांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या निवासस्थानी सहकुटुंब घेतला शिरकूर्माचा आस्वाद..

कणकवली दि.११ एप्रिल(भगवान लोके)

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील कामयाब निवासस्थानी भेट देत नाईक कुटुंबियांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्नी सौ.नीलम राणे, चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्यासह अबिद नाईक यांच्या घरी जात सहकुटुंब शिरकुर्माचा आस्वाद घेतला.

नाईक कुटुंबियांची अत्यंत आस्थेने विचारपूस करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. अबिद नाईक यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना शाल पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तर उद्योजक आसिफ नाईक यांनी आमदार नितेश राणे यांना शाल पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य ऍड सावळाराम अणावकर, अबिद नाईक यांचे वडील अब्दुल नाईक, आई हवाबी नाईक, बंधू आसिफ नाईक, अनिस नाईक, हुमेरा नाईक, नजमा नाईक, इकरा नाईक, रिजा नाईक, मेहक नाईक,अली नाईक, गणेश चौगुले, अमित केतकर, निशिकांत कडुलकर, इम्रान शेख, कुंदन हर्णे,केदार खोत आदी उपस्थित होते.