ज्येष्ठ नागरिकांना ऊन पावसापासून त्रास होऊ नये यासाठी शेड उभारून त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आले का प्रशासनाने करावी

सावंतवाडी,दि.१६ जानेवारी
शहरातील मोती तलावाच्या काठी तसेच उद्यानात ज्येष्ठ नागरिकांना ऊन पावसापासून त्रास होऊ नये यासाठी शेड उभारून त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आले का प्रशासनाने करावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी अण्णा उर्फ वसंत केसरकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे याबाबतचे निवेदन त्यांनी पालिका प्रशासनाला सादर केले.
श्री केसरकर यांनी या संदर्भात पत्रक परिषदेत दिले आहे त्यात असे म्हटले की सावंतवाडी शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे यामध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांचा व गुरांचा बंदोबस्त करण्याबरोबरच विजेच्या लाईन वर आलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्या तोडून धोका दूर करावा तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वर शप्पथ वगैरे बांधून निवाराची व्यवस्था करावी यामुळे पावसापासून उन्हापासून त्यांचे संरक्षण होईल याकरिता मोती तलावाभोवती तसेच उद्यान वगैरे काही आवश्यक जागा निवडण्यात याव्यात केशव कट्ट्यावरील जागेत व कट्ट्याकडे जाणाऱ्या वाटेत दोन्ही बाजूने निवाराची सोय करण्यात यावी व आत मध्ये बाकडे वगैरे बसवण्यात यावे अशा प्रकारचे निवारे नसल्याने पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी मिळत नाही नागरिकांचे वाढदिवस वगैरे करावणुकीचे कार्यक्रम करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पालिकेकडे कायमस्वरूपी ठेवलेल्या पाच लाखाच्या रकमेच्या व्याजातून खर्च करण्यात यावा. या संदर्भात त्यावेळी नगरपालिकेच्या मासिक बैठकीमध्ये ठराव घेण्यात आलेला आहे या ठरावाची अंमलबजावणी अद्यापही करण्यात आलेले नाही तरी ती अंमलबजावणी करण्यात यावी तसेच वार्षिक बजेटमध्ये अशा प्रकारच्या नियोजनासाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी असे मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या नियोजनावर प्रदीप पियोळकर, शंकर प्रभू, दत्तप्रसाद गोटसकर, प्रकाश मसुरकर, मुकुंद वझे, हरी भाट आदींच्या सह्य़ा आहेत.