आंबेडकर जयंती निमित्त सावंतवाडी येथे” साद मराठीची “कार्यक्रम

सावंतवाडी दि.११ एप्रिल
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती समाज मंदिर सावंतवाडी येथे रविवार दि.१४ एप्रिल रोजी सावंतवाडी नगरपालिका व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने साजरी होणार आहे
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून त्रिसरण पंचशील व बुद्ध पूजा पाठ होणार आहेत त्यानंतर विविध कार्यक्रम व अभिवादन सभा होणार आहे सायंकाळी ७ वाजता भीमगर्जना बौद्ध मंडळाच्या वतीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा मराठमोळा कार्यक्रम साद मराठीची होणार आहे.
या कार्यक्रमाचे कार्यक्रमांमध्ये सदाबहार जुनी नवीन हिंदी मराठी गीते देशभक्तीपर गीते भीम गीते अशा गीतांचा नजराणा असणार आहे तसेच भव्य दिव्य नृत्याविष्कार, कॉमेडी व मिमिक्री असणार आहेत. खास आकर्षण बुद्ध चरित्रावर नाटिका व भव्य दिव्य शिव राज्याभिषेक सोहळा दाखवण्यात येणार आहे हा कार्यक्रम रसिका डान्स ग्रुप कणकवली सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मंगेश कदम, सचिव रुपेश जाधव, खजिनदार मीनाक्षी पवार व मंडळाचे सभासद व पदाधिकारी यांनी केले आहे.