भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान शिबिराला उस्फुर्त असा प्रतिसाद,

देवगड,दि ११ एप्रिल

शिरगाव येथील राजे ग्रुप शिरगाव व सिंधू रक्त मित्र मंडळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमानाने प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे शिरगाव राजे ग्रुपचे पदाधिकारी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राजे ग्रुपच्या वतीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे पन्नास हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
यावेळी संदीप साटम,अमित साटम, मंगेश लोके,अमित कदम,राजू शेट्टी, महेश शिरोडकर, निलेश साटम, बंडू माने,सुहास परब,देवदत्त कदम,महेश पवार,सुभाष नार्वेकर,सदानंद देसाई, आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच राजे ग्रुपच्या वतीने उपस्थित रक्तदात्यांचे व सिंधुदुर्ग रक्तपेढी यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले