मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित तालुका स्तरीय कथा -कथन स्पर्धा -कु.दिया संदीप साटम प्रथम

देवगड,दि.१६ जानेवारी

स. ह.केळकर कॉलेज देवगड येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 8 वी या शालेय गटात प्रथम क्रमांक कु.दिया संदीप साटम ,द्वितीय क्रमांक कु.राज्ञी विवेक कुलकर्णी आणि तृतीय क्रमांक कु.स्वालिहा रफिक नायकवडे हिने प्राप्त केला.सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.कु.दिया साटम हिने वाढदिवसादिवशीच हे यश मिळवले त्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे.कु.दिया संदीप साटम हिला डॉ.राजेंद्र चव्हाण ,आई सौ.स्वाती संदीप साटम आणि उमा मिलिंद पवार स्कुल मधील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले