दोडामार्ग, दि ११ एप्रिल
आज दोडामार्ग दौऱ्यावर असताना भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यालयास सदिच्छा भेट देण्याचा योग आला. यावेळी महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले व पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी माझ्यासमवेत आमचे मित्र दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष श्री. चेतन चव्हाण, भाजपा दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष श्री. सुधीर दळवी, सरपंच श्री. देवेंद्र शेटकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. पराशर सावंत तसेच दोडामार्गचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.