शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती व राम मंदिर उदघाटनाच्या अनुषंगाने १८ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

मालवण,दि.१६ जानेवारी

शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती व राम मंदिर उदघाटनाच्या अनुषंगाने मालवण तालुका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने दि १८ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे रक्तदान शिबीर तसेच दुपारी १२ वाजता राम मंदिर निर्माणाच्या समर्थनार्थ मालवण शहर मामा वरेरकर नाट्यगृह ते बस स्टॅंड नजीकच्या राम मंदिर येथे बाईक रॅली काढण्यात येणार आहे. यानंतर दुपारी १ वाजता राम मंदिर येथे महाआरती तसेच दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ जानेवारी ते २० जानेवारी या कालावधीत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेऊन आकर्षक बक्षीसे देण्यात येणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर आणि शहर प्रमुख बाबी जोगी यांनी दिली आहे