सावंतवाडी दि.११ एप्रिल
केंद्रीय मंत्री नाम. श्री. नारायण राणे यांच्या पत्नी सौ.नीलमताई राणे यांनी आज गाव भेट दौऱ्या निमित्त आंबोली गावाला भेट घेऊन खास महिलाशी संवाद साधला.
या वेळी त्यांनी आंबोली चे ग्रामदैवत श्री देवी माऊलीच्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले या वेळी आंबोली चे प्रमुख गावकर श्री शशिकांत गावडे व सरगावकर श्री श्रीकांत गावडे व इतर गावकर मंडळी उपस्थित होती.
या नंतर त्यांनी आंबोली गावचे उपसरपंच श्री सदाशिव उर्फ दत्तू नार्वेकर यांच्या निवास स्थानी भेट दिली या वेळी आंबोली ग्रामपंचायत च्या सदस्य सौ छाया नार्वेकर, स्वप्नीता कर्पे, श्री शंकर चव्हाण व इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्तित होते.
तसेच महिला मेळाव्यासाठी माजी शिक्षण व आरोग्य सभापती श्री आत्माराम पालेकर यांच्या निवास स्थानी भेट दिली, त्या ठिकाणी क्रांतिसूर्या श्री महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मेळाव्यास मार्गदर्शन केले.
या वेळी आंबोली महिला मंडळ प्रमुख सौ प्राजक्ता केळुस्कर यांनी प्रास्ताविक केले, त्या नंतर सौ तेरसे यांनी मार्गदर्शन केले व त्या नंतर सौ नीलम राणे वाहिनी नी सर्वाशी संवाद साधला व मान.श्री नारायण राणे यांचे कोकणावर असलेले प्रेम, त्यांनी केलेले कार्य व केंद्रातील मंत्री पदावर असताना त्यांनी केलेल्या कार्याचा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला गौरव या बाबत माहिती दिली. तसेच केंद्रात मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला हक्काच्या माणसाला यावेळी आपल्याला दोन लाख मतांनी निवडून देण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या.
आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून मोदी साहेबांच्या पाठीशी थांब पणे उभे राहण्याचा शब्द त्यानी सर्वांच्या वतीने दिला.
या वेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष सौ श्वेता कोरगावकर, सौ तेरसे , आंबोली महिला मंडळ अध्यक्ष सौ केळुसकर , सौ गावकर , आंबोली मंडळ अध्यक्ष श्री रवींद्र मडगावकर, आंबोली गावप्रमुख श्री रामचंद्र गावडे, आंबोली महिला गाव प्रमुख सौ नमिता राऊत, आंबोली शक्ती केंद्र प्रमुख श्री दिलीप सावंत,आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर, आंबोली उपसरपंच श्री दत्तू नार्वेकर, आंबोली ग्रामपंचायत सदस्य श्री शंकर चव्हाण, श्री दीपक नाटलेकर, सौ सारिखा गावडे, सौ साक्षी गावडे, सौ छाया नार्वेकर, सौ स्वप्नीता कर्पे, चौकूळ ग्रामपंचायत सदस्य सौ आरती कर्पे, आंबोली हाय स्कूल अध्यक्ष प्रकाश गावडे,आंबोली तंटामुक्ती अध्यक्ष श्री उल्हास गावडे, आंबोली बुथ अध्यक्ष श्री महादेव गावडे-उमेश पडते -ध्यनेश्वर राऊत -तुकाराम पाटील, सुपर वॉरियर्स श्री संतोष पालेकर, युवा अध्यक्ष अमित गावडे,आंबोली सोसायटी संचालक श्री भीमसेन गावडे- सौ दिव्या सावंत -मधू यमकर,श्री जगजीवन राऊळ,ज्येष्ठ पत्रकार श्री विष्णू चव्हाण,व गावडे, पडते, पाताडे, कोठूळे, नाईक, घोगळे, डोंगर, चव्हाण, खरूडे, राऊत, पडवळ, नाटलेकर,बंड, गुरव, पालव, खरात, शेळके, काळे, आवटे, पाटील, यमकर, जंगले, पटकारे, येडगे, कालेलकर, कर्पे, नार्वेकर, सावंत, जाधव, लांबोर इत्यादी महिला वर्ग, युवा वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.