शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री मा.ना. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या १३ शाळा पी.एम. श्री. स्कुल योजनेमध्ये समाविष्ट

सावंतवाडी दि.१६ जानेवारी
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी देशामधील शाळांसाठी P.M. Shri (Prime Minister Schools for Rising India) ही महात्वाकांक्षी योजना सुरु केलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा. ना. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून या केंद्रपुरस्कृत योजनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या एकूण १३ शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे.
यामध्ये सावंतवाडी तालुक्यातुन भारतरत्न अटल बिहारी वायपेयी इंटनॅशनल स्कुल चराठे नं. १, व जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं. २. वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद सेंट्रल प्रायमरी स्कुल शिरोडा नं. १, व जिल्हा परिषद शाळा शिवाजी प्रागतीक वेंगुर्ले, तर दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दोडामार्ग सावंतवाडा या शाळांचा समोवश आहे. तर देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जामसंडे नं. १ व जिल्हा परिषद शाळा शिरगांव नं. १, कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कणकवली नं. ३ व जिल्हा परिषद शाळा तळेरे नं. १, वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकीसरे या शाळांचा समावेश आहे.

कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कुडाळ कुंभारवाडी व जिल्हा परिषद शाळा पिंगुळी सराफदारवाडी, मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चौके नं. १ अशा एकुण १३ शाळांचा समावेश आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्याकरीता सदर शाळांची निवड करण्यात आली असुन या शाळा परिसरातील अन्य शाळांना मार्गदर्शक ठरतीय यादृष्टीने विकसीत करण्यात येणार आहेत. या शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंतर्भुत असलेले घटक दिसुन येणार आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत.

सिंधुदुर्गातील या १३ शाळांना एकुण १,०२,४७,०००/- एवढी रक्कम शाळांच्या खाती वर्ग करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पुर्व प्राथमिक वयोगटातील बालकांना शाळा स्तरावर आवर्ती व अनावर्ती शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रती विद्यार्थी ५००/- रुपये तरतूद मंजूर केलेली आहे. राष्ट्रीय आविष्कार अभियान अंतर्गत विज्ञान व गणित हे विषय सुलभ पद्धतीने प्रत्यक्ष अनुभवावर आधारित साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी विज्ञान व गणित कीट खरेदी करण्यासाठी प्रती शाळा २०,०००/- रुपये तसेच विज्ञान व गणित सर्कल विकसीत करण्यासाठी आवश्यक पुरक साहित्य उपलब्ध करुन त्यामधुन या सर्कलची निर्मिती करण्यासाठी प्रतीशाळा ५,०००/- रुपयाची तरतूद देण्यात आलेली आहे.

ग्रंथालय निर्मितीसाठी प्रती शाळा १,०५,०००/- तरतूद करण्यात आलेली आहे. किडा व खेळ साहित्यासाठी प्रती शाळा ५०,०००/- रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. Bala Write या उपक्रमासाठी प्रतीशाळा ५०,०००/- रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पुर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी अनुकुलीत बैठक व फर्निचरसाठी प्रती शाळा १,५०,०००/- ची तरतूद उपलब्ध करण्यात आलेली आहे. शाळा इमारतीच्या मोठया दुरुस्तीसाठीसुद्धा अनुदान देण्यात आलेले आहे. या शाळांमध्ये हरित शाळा निर्माण करण्यासाठी सुद्धा तरतूद उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. हरितशाळा (Green School) या अंतर्गत सौर पॅनल LED लायटींगचा वापर नैसर्गिक शेतीसह पोषण बागा, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्ती, जलसंधारण, वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच शाळांना वार्षिक शाळा अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत शाळांमधील ५ वी ते १० वी तील मुलींकरीता मार्गदर्शन व मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करुन सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना.श्री. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून या १३ शाळांची निवड झाली असून भविष्यात या शाळा त्या परिसरातील इतर शाळांना मार्गदर्शक ठरतील यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. P.M. Shri योजनेमध्ये जिल्हयातील या शाळांची निवड केल्याबद्दल शिक्षणप्रेमी नागरिक तसेच संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, ग्रामस्थ, व समस्त पालकांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर साहेबांचे आभार मानुन अभिनंदन केलेले आहे.