नांदगाव येथे श्रीराम प्रतिष्ठापना निमित्त २२ जानेवारी रोजी भव्य मिरवणूक

नांदगाव दशक्रोशीतील श्रीराम भक्तांच्या वतीने आयोजन ; श्रीराम प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण दाखवणार

कणकवली दि.१६ जानेवारी (भगवान लोके)

अयोध्यानगरीत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी २०१४ रोजी पार पडत आहे.त्या निमित्ताने नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांच्या वतीने श्रीराम यांची भव्य मिरवणूक,महाआरती, श्रीराम प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.

सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी श्री राम प्रतिष्ठापना होणार आहे.तब्बल ५०० वर्षानंतर हा दिवस सुवर्ण योग आलेला आहे.त्यानिमित्ताने नांदगाव दशक्रोशी श्री राम भक्त यांच्या वतीने भरगच्च धार्मिक कार्यक्रमाचे व भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानिमित्त सकाळी ७ ते ९ प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या मंदिरात पूजा करणे, दिवा बत्ती करणे, सकाळी ९.३० वाजता नांदगाव तिठा येथून मिरवणूकीने नांदगाव मोरये वाडी येथील श्रीराम मंदिर येथे प्रयाण व मंदिर येथे आरती करणे, सकाळी १०.१५ वाजता नांदगाव मोरये वाडी ते गोसावी वाडी कुंभार वाडी श्रीराम मंदिरात येथे प्रयाण व आरती करणे , सकाळी ११.३० वाजता भव्य मिरवणूक पुन्हा नांदगाव तिठा येथे येईल.त्यानंतर नांदगाव येथील ब्रिज खाली LED TV स्क्रीन वर सर्व भक्तांना अयोध्या येथील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. दुपारी १ वाजल्यानंतर तोंडवली येथील श्री हनुमान मंदिर येथे सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजता आपल्या जवळील मंदिरात तसेच प्रत्येक घरातील अंगणात दिव्यांची आरस करुन उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तरी नांदगाव, असलदे, कोळोशी, आयनल,तोंडवली – बावशी ,ओटव , बेळणे,सावडाव ,माईण आदी दशक्रोशितील सर्व श्री रामभक्त यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री राम भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.