श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात संपूर्ण स्वच्छ्ता मोहीम

कणकवली नगरपंचायतमार्फत आयोजन ; मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची माहिती

कणकवली दि.१६ जानेवारी(भगवान लोके)

कणकवली नगरपंचायत तर्फे १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.

या अंतर्गत या परिसरातील रस्‍ते, गटारे, नाल्‍यांचे प्रवाह स्वच्छ करण्‍यात येणार आहेत. या अभियानामध्‍ये सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद सहभागी होणार आहेत. तरी कणकवली शहरातील जास्‍तीत जास्‍त स्वच्छताप्रेमी नागरिकांनी संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहिमेमध्‍ये सहभागी व्‍हावे असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.