सावंतवाडी दि.१२ एप्रिल
सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .
यामध्ये इ . ३ री तील कु . आलिया फहिम मुजावर , कु.आद्या मोरेश्वर जोशी , कु . हबीबा कैस बागवान ,इ . ४ थी तील कु . अनुजा राजेंद्र चौधरी , कु . मोहम्मद अश्मान आलिम मकानदार , इ . ६ वी तील कु . समर्थ रामचंद्र सावंत हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले .या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. प्रितम गोंगाणे यांनी मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .