रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी दाखल केला अर्ज

रत्नागिरी, दि.१२ एप्रिल

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी माहिती ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.