कणकवली १६ जानेवारी (भगवान लोके)
कणकवली कांबळे गल्ली, बाबा भालचंद्र नगर, गणपती साना येथे कातकरी समाजाच्या वस्तीमध्ये “माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे सल्लागार ,पदाधिकारी व सदस्य मंडळाच्या वतीने कातकरी समाज कुटुंबांना चादर व बेडशीट वाटप करण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , दादा कुडतरकर, संजय मालंडकर, अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते कातकरी समाजाच्या सर्व कुटुंबांना सोलापूरी चादर व बेडशीट वाटप करण्यात आले.यावेळी अविनाश गावडे, बाबुराव घाडीगावकर ,विशाल रजपूत, महेश मेस्त्री, भगवान कासले, प्रभाकर कदम,लक्ष्मण महाडीक, सईद नाईक, हेमंत नाडकर्णी, महेश वांयगणकर, प्रसाद उगवेकर, प्रसाद पाताडे, सचिन कुवळेकर, इन्शुरन्स सल्लागार साळसकर, निखार्गे, मोडक, यांच्या सहित सर्व मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.