मालवण,दि.१२ एप्रिल
आगामी उन्हाळा कालावधी विचारात घेउन धामापुर तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने मालवण नगरपालिकेतर्फे एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरपरिषदे मार्फत मालवण शहरात करण्यात येणारा पाणीपुरवठा दि. १५ एप्रिलपासुन दिवसाआड करण्यात येईल, याची सर्व नळ जोडणी धारकांनी नोंद घ्यावी व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
यामध्ये झोन १ मध्ये दि. १५ एप्रिल रोजी आडारी रोड गणपती मंदिर पर्यत, नारायण मंदिर समोरील शांतीसागर मैदान परीसर, पेट्रोल पंप समोरील परिसर, कुडाळकर हायस्कुल जवळील परिसर, रेडकर हॉस्पीटलच्या आजूबाजूचा परिसर, गवंडीवाडा. दांडी मोरेश्वर मंदिर परीसर, आडवण-वायरी रोड, रामेश्वर मंदिर मागील परिसर, सातेरी मंदिर जवळील परिसर येथे पाणीपुरवठा होईल. तर झोन २ मध्ये दि. १६ एप्रिल रोजी धुरीवाडा, गारुडेश्वर मंदिर पर्यत, श्रीकृष्ण मंदिर, चिवला बीच ते चौकचार रोड, कोतेवाडा, कचेरी रोड. मेढा काळबादेवी रोड, पोलिस वसाहत ते राजकोट, जयगणेश मंदिर परीसर, भुत आंबा ते रेवतळे चर्च रोड, फाटक शाळा परीसर, भरड ते बंदर जेटी पर्यत, लिमये हॉस्पिटल ते पोस्ट ऑफिस समोरील परीसर येथे पाणी पुरवठा होईल, याच प्रमाणे एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरु राहील, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.