कणकवली दि.१२ एप्रिल
हुंबरठ पिंपळवाडी येथील लक्ष्मीकांत गोपाळ तेंडुलकर (५०) यांच्या शुक्रवारी राहत्याघरी आकस्मिक मृत्यू झाला. याबाबतची खबर यांची बहीण आरती व्यंकटेश प्रभूराळकर (५६, रा. आजगाव सावंतवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.
आरती प्रभू राळकर या शुक्रवारी सकाळी ९ वा.आपल्या हुंबरठ पिंपळवाडी येथील माहेरी आले असताना त्यांना आपला भाऊ लक्ष्मीकांत हा घराशेजारील शेडमध्ये झोपलेले दिसून आले. त्यावेळी त्यांना आवाज दिला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही मात्र त्यानी डोळे उघडून पाहिले त्यामुळे त्यांनी मध्य प्राशन केला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आरती प्रभूराळकर यांनी भाऊ लक्ष्मीकांत याला घरामध्ये नेऊन झोपून कामानिमित्त बाहेर गेले. दुपारी दोन वाजता घरी आले त्यावेळी लक्ष्मीकांत याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरती प्रभूराळकर यांनी गावातील डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासून पाहिले असता त्यांनी लक्ष्मीकांत तेंडुलकर यांना मयत घोषित केले