सावंतवाडी दि.१३ एप्रिल
गेली दोन वर्षे पू.गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान आजगावात शैक्षणिक कार्य करीत आहे. प्रतिष्ठानने गतवर्षी पाचवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आणि सहावी सातवीसाठी विज्ञान व इंग्लिश ग्रामर असे अडीचशे तास विनामूल्य मार्गदर्शन केले आहे.
याशिवाय आकाश निरीक्षण, पंचांग वाचन, वाचन साधना आदी उपक्रमही प्रतिष्ठानतर्फे राबवले जात आहेत. प्रतिष्ठानच्या कार्याचा व्याप वाढत असल्याने त्याचे नियोजनाबाबत चर्चा करणेसाठी रविवार दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मराठी शाळेच्या प्रांगणात एका सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमींनी या सभेस जरूर उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे समन्वयक विनय सौदागर यानी केले आहे.