पडीक जमीनीवर कृषी क्रांती घडवून आणली जावू शकते याचे उत्तम उदाहरण मनोज पुरुषोत्तम पराडकर
सावंतवाडी दि.१३ एप्रिल (अभिमन्यू लोंढे)
मेहनत घेतली तर पडीक जमीनीवर कृषी क्रांती घडवून आणली जावू शकते याचे उत्तम उदाहरण मनोज पुरुषोत्तम पराडकर यांनी घालून दिले आहे. त्यांनी वीस गुंठे क्षेत्रावर सहा प्रकारच्या विदेशी भाज्या आणि ८०० स्क्वेअर फूट जमीनीत ऑथस्टर मशरूम (अळंबी) चे उत्पादन घेतले आहे. या उत्पादनाला सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यात बाजारपेठ उपलब्ध असून त्यांनी या बाजारपेठेत उत्पादन विक्रीला ठेवले आहे. त्यांच्या या प्रयोगातून भूमिपुत्रांना नवीन संदेश मिळाला आहे.
फाॅरेन्सी बॅकिंग क्षेत्रातील नोकरीत लाखो रुपयांचे पॅकेज मिळत होते . विदेशात दुबई मध्ये संधी उपलब्ध झाली होती, ती नाकारत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण कट्टा पराड येथील मनोज पुरुषोत्तम पराडकर या ५२ वर्षाच्या भूमिपुत्राने सिंधुदुर्ग गाठला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन आणि कृषी क्षेत्रात असलेल्या संधीचा अभ्यास करून उत्पादनाला चालना देण्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास केला. जिल्ह्यातील जमिनी पाहील्या. माडखोल नमसवाडी येथील जमीन सिंधुदुर्ग व गोवा बाजारपेठेला योग्य असल्याने १२ एकर जमीन विकत घेऊन विकसित करण्याचे धोरण स्वीकारले. पडीक जमीनीवर कृषी क्रांती घडवून पर्यटन आणि अनेकांच्या हाताना रोजगार उपलब्ध करून देता येईल असे धोरण निश्चित केले.
यावेळी अनेकांच्या हाताना रोजगार मिळवून देण्याच्या इराद्याने त्यांनी सावंतवाडी तालुक्यातील माडखोल नमसवाडी येथे पराडकर फाॅर्म हाॅऊस निर्माण करून एक्सोबाईट कंपनी स्थापन केली.
माडखोल नमसवाडी येथे एक्सोबाईट कंपनी च्या माध्यमातून हब अॅण्ड स्कोप धर्तीवर जिल्हात अनेकांना प्रोत्साहन देणाऱ्या ऑथस्टर मशरूम (अळंबी) उत्पादन आणि विक्री सुरू केली आहे. जिल्हात येत्या तीन वर्षात अळंबी उत्पादन वाढीचे प्रयत्न ते करणार आहेत. कमी खर्चात, जागेत जास्त उत्पादन करतानाच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करून देण्यासाठी मनोज पराडकर प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले. जिल्ह्यात ३०० जणांना अळंबी उत्पादनातून रोजगार मिळवून देण्याचे स्वप्न समोर ठेवून वाटचाल सुरू केली आहे असे त्यांनी सांगितले.
माडखोल येथे सेंद्रिय पध्दतीने अळंबी उत्पादन ८०० स्क्वेअर फूट जमीनीत घेतले आहे. तसेच वीस गुंठे क्षेत्रावर सहा प्रकारच्या विदेशी भाज्या घेतल्या जातात. या भाज्याना सिंधुदुर्ग व गोवा मध्ये बाजारपेठ उपलब्ध आहे. या मध्ये चेरी टोमॅटोची लागवड केली आहे तसेच ब्रोकोली,जूकीली,हॅलिफोनी, ड्राय मशरूम अशा उत्पादनांना प्राधान्य देत उत्पादने घेऊन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत.
माडखोल येथे एकाच वेळी अनेक पीके घेतली तर एक पीक तोट्यात गेले तर दुसऱ्या पीकांचे उत्पादन आर्थिक दृष्ट्या तारेल म्हणून सुपारी,केळी फळफळावळ सेंद्रिय पध्दतीने घेण्याचा मानस आहे. त्यासाठी पाळीव जनावरांना प्राधान्य देण्यात येईल असे मनोज पराडकर यांनी सांगितले. हायड्रोपाॅलिक फार्मीगचे श्री. पराडकर यांनी प्रशिक्षण घेतले आहे तसेच युट्यूबवरून अध्यायात माहिती घेऊन कमी जागेत भरपूर उत्पादन आणि विविध फळफळावळ, कृषी उत्पन्न, पर्यटन सारखे प्रयोग यशस्वी करून दाखविण्याची तयारी ठेवली आहे असे त्यांनी सांगितले.
ऑथस्टर मशरूम (अळंबी) उत्पादन ८०० स्क्वेअर फूट जमीनीत घेतले. या दरम्यान हब अॅण्ड स्कोप धर्तीवर जिल्हात अनेकांना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इच्छुकांना ऑथस्टर मशरूम (अळंबी) प्रशिक्षण देत येत्या तीन वर्षात अळंबी उत्पादन वाढीचे प्रयत्न करत राहणार आहे असे त्यांनी सांगितले. जवळपास ८० ते ९० युनिट पहिल्या टप्प्यात करुन त्यांत वाढ करत ३०० युनिट उभारून अळंबी उत्पादन वाढीचे प्रयत्न करणार आहे असे ते म्हणाले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अळंबी उत्पादन वाढीचे प्रयोग करून अनेकांच्या हाताना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असे मनोज पराडकर यांनी सांगितले. अळंबी उत्पादन वाढीसाठी जवळपास दिड लाख रुपये तर पाॅली हाऊस उभारणीसाठी १५ लाख रुपये खर्च आला आहे. पाॅली हाऊस वीस गुंठे क्षेत्रावर उभारून विदेशी सहा प्रकारच्या भाज्या घेतल्या आहेत. यामुळे नक्कीच एकादी भाजी आर्थिक दृष्ट्या संकटात आणणारी ठरली तर दुसरी भाजी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयोगी ठरेल असे मनोज पराडकर यांनी सांगितले. मशरूम (अळंबी) आणि ड्राय मशरूम (अळंबी) उत्पादनाला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे असे त्यांनी सांगितले.
माडखोल धवडकी शाळा नंबर दोन च्या ३८ विद्यार्थ्यांना उद्या रविवार दि.१४ एप्रिल रोजी शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना देखील कृषी क्रांती बाबतीत माहिती दिली जाईल. एक्सोबाईट कंपनीचा शुभारंभ अभिनेता राजेंद्र शिसतकर व डॉ प्रसाद देवधर यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता नमसवाडी येथील पराडकर फाॅर्म हाॅऊस येथे करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.