सिंधुदुर्ग पोलीस दलातील १० उपनिरिक्षकांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या ; पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी काढले आदेश

कणकवली दि.१६ जानेवारी(भगवान लोके)

सिधुदूर्ग जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या १० पोलीस उपनिरीक्षक यांच्या जिल्हा आस्थापना मंडळ यांच्या मान्यतेने बदल्या करण्यात आल्या आहेत.त्याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आदेश काढले आहेत.

कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक विनायक महादेव चव्हाण यांची बदली पोलिस नियंत्रण कक्ष, सिंधुदूर्गनगरी ,सावंतवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक अमित भिकाजी गोते यांची जिल्हा विशेष शाखा, सिंधुदूर्गनगरी,कुडाळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सागर जालिंदर शिंदे यांची बदली कणकवली पोलिस ठाणे, कुडाळ पोलिस ठाणे येथील पोलिस उपनिरीक्षक विनायक आप्पा केसरकर यांची बदली देवगड येथे झाली आहे.
मालवण येथील पोलिस उपनिरीक्षक नितीन रामचंद्र नरळे यांची सावंतवाडी येथे बदली झाली.सावंतवाडी येथील पोलिस उपनिरीक्षक आनंद पांडुरंग यशवंते यांची मालवण येथे बदली झाली.देवगड पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र सहदेव कांबळे यांची कुडाळ येथे बदली झाली आहे.

सावंतवाडी पोलिस उपनिरीक्षक गजानन प्रल्हादराव भालेराव यांची पोलिस नियंत्रण कक्ष, सिंधुदूर्गनगरी येथे बदली झाली आहे.कुडाळ येथील पोलिस उपनिरीक्षक समीर सदानंद भोसले यांची देवगड येथे बदली झाली आहे.कणकवली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र जगन्नाथ गाडेकर यांची पोलिस नियंत्रण कक्ष, सिंधुदूर्गनगरी येथे बदली झाली आहे.